नमस्कार मित्रहो! मी कोणी कवी किंवा लेखक नाही पण आजच्या घडीला सर्वसामान्य शेतकरी बांधवांची झालेली कोंडी बघून मी ही छोटीशी कविता आपल्या शेतकरी
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
पण एकदा करून बघा ना,
काय नेमकी राहती..
जीव जायला होतो ओ,
दिवसरात्र करून मशागती..
पण तुम्ही म्हणता,
आहे ना तुला एवढी शेती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
बी बियाणासाठी,
दुकानदार वरवर फिरवती..
मोटार चालू करायला गेलेल्या बापाची,
येईल की नाही वाट पिल्लं त्याची पाहती..
काय उपयोग ओ
त्या लाईटचा,
जी रात्री येऊन दिवसा जाती..
बापावर आमच्या दिवसा काम अन,
रात्री पन त्याचीच वेळ येती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
एकदा खरच करून बघा,
साहेब काय आमची जिरती..
कधी दुष्काळ तर,
कधी अवकाळी होती..
हाता तोंडाशी आलेला घास,
पण अनेकदा घेऊन जाती..
एवढ होऊनही आम्ही,
कधीच नाही खचती..
पण देवही नाही आमच्या बाजूने याची,
आम्हाला नक्की होते प्रचिती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
साहेब एसी मध्ये बसून तुम्ही मंडळी आमच्या,
समस्यावर अभ्यास करती..
एखादा दिवस घालवाना सोबत,
आमच्या शेताच्या बांधा वरती..
साहेब हिरव्यागार पिकाला आमचं,
रक्त आणि घाम असतो सोबती..
बघणारी तुम्ही लोक तर,
वरवर अंदाजच लावती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
निसर्ग पण कधी कधी,
आमच्या सोबत खेळ खेळती..
पोटच्या पोरासारख जपलेल
पीक,
आमच्या समोरच संपताना,
आम्ही ढसाढसा रडती..
आतून तुटलेला आमचा बाप मात्र,
गपगुमान सगळं बघती..
आमच्या समोर हसून मनात,
वाईट विचार त्याच्या घर करती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
सगळं झाल्यावर नेतेमंडळी आमच्या शेताकडे जाती..
तोपर्यंत पिकाच उरलेल औषध,
आमच्या बापाच्या येत हाती..
साहेब तुम्हाला कशाच पीक आहे ,
हे पण नसत ओ माहिती..
अशात तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं,
उत्तर देताना आम्हालाच लाज वाटती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
पंचनामे करायला अन् मदत,
करायला तुम्ही महिना लावती..
एवढ सोंग करून तुम्ही तुटपुंज्या,
करता जाहीर मदती..
साहेब वाटत तुम्ही पण आमच्या,
सोबत चेष्टाच करती..
देव तर नाहीच नाही पण, सरकारही नाही वाली,
जाणीव आम्हाला मग होती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती..
साहेब एखाद पीक नक्की करून बघा,
काय शिल्लक राहती..
उगाच काहीतरी अंदाजपंचे बोलून,
नका करू तुमच्याच जाहिराती..
या शेती आणि नुकसानी पायी,
सोबतच्या बापाला पोरं
त्याची फोटोत पाहती..
दिसत तस नसत अस,
उगाच नाही म्हणती..
साहेब विचार करा शेतकरी
बांधवाचा,
नाही तर येणार नाही ओ,
तुमच्या पण काहीच हाती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून तुम्हाला शेती
आपला देश कृषीप्रधान आहे अस तुम्ही मंडळी म्हणती..
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे अस तुम्हीच बोलती..
हमीभाव तर सोडाच ओ साहेब पण,
दहाची भाजीची जुडी पाच ला दे,
यासाठी तुम्हीच लोक त्याच्याशी भांडती..
साहेब खूप सोपी वाटते ओ अजून पण तुम्हाला शेती…
Leave a Reply